प्राथमिक आरोग्य केंद्र सडुरे व उपकेंद्रच्या समस्या सहीत वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, पोलीस पाटील ही रिक्त पदे भरती करणे बाबत वेधले लक्ष
वैभववाडी
तालुक्यातील सडुरे शिराळे, कुर्ली अरूळे निम अरूळे सांगुळवाडी या पंचक्रोशीमधील अनेक समस्याबाबत सडूरे शिराळे ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपा वैभववाडी तालुका युवा सरचिटणीस नवलराज काळे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
काळे यांनी निवेदनात म्हटले आहे की, प्राथमिक आरोग्य केंद्र वैभववाडी सडूरे ही समस्त पंचक्रोशीतील जनतेची लाइफ लाइन बनली आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राचा सडूरे शिराळे सहित कुर्ली,अरुळे, निम अरुळे, सांगुळवाडी नावळे या गावांना फायदा होत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत अजून अद्यावत झालेली नाही. संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मंजुरी ची फाईल मंत्रालयात धूळ खात पडलेली आहे. यासंदर्भात तहसीलदार साहेब आपल्या माध्यमातून पाठपुरावा व्हावा. त्याचप्रमाणे या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध नाही. या प्राथमिक आरोग्य केंद्राला कायमस्वरूपी रुग्णवाहिका उपलब्ध करून मिळावी. या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नियमानुसार दोन डॉक्टर असले पाहिजेत. पण सध्या या ठिकाणी एकच डॉक्टर कार्यान्वित आहेत. कारण नवीन असलेल्या डॉक्टरांना कोविड सेंटर सांगुळवाडी येथे दुपारनंतर प्रशासनाने ड्युटी लावली आहे.त्यामुळे दुपार नंतर प्रा. आ.केंद्र मध्ये डॉक्टर उपलब्ध नसतात. तरी डॉक्टर पदाची रिक्त असलेली जागा त्वरित भरण्यात यावी. त्याचप्रमाणे सडूरे गावचे उपकेंद्र सडूरे गावासहीत शिराळे, अरुळे, निमरुळे, या तीन गावांना जोडले गेले आहे. या उपकेंद्रांमध्ये कायमस्वरूपी आरोग्य सेवक अद्याप मिळालेला नाही, तसेच आरोग्य सेविका ही हे पद रिक्त आहे, सध्या या पदावरती प्रभारी कामकाज पहात असणारे आरोग्य सेवक, आरोग्य सेविका यांना कामाचा लोड पडत असलेमुळे यंत्रणेवर ताण पडत आहे त्यामुळे गावामध्ये कोरोनाचा प्रसार जास्त प्रमाणात होण्याची शक्यता काळे यांनी निवेदनात भीती व्यक्त केली आहे.तसेच मागे दिलेल्या लसीकरण संदर्भात या निवेदनाची दखल घेत लवकरात लवकर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लसीकरण चालू करण्यात यावे.
त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील नावळे
सडूरे शिराळे या गावांसाठी स्वतंत्र पोलीस पाटील पदाची लवकरात लवकर नेमणूक करावी. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर एका पोलीस पाटलांकडे तीन गावांचा चार्ज देणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे गावातील कामकाजावर परिणाम होतोय तरी या पोलिस पाटलाच्या जागा त्वरित भरण्यात याव्यात व आमच्या पंचक्रोशीला न्याय द्यावा अशी मागणी सडूरे शिराळे ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपा युवा सरचिटणीस नवलराज काळे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार रामदास झळके यांच्याकडे केली आहे. या न विज्ञानाच्या प्रति जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, आरोग्य सभापती जिल्हा परिषद सिंधुदुर्ग डॉक्टर अनिषा दळवी, वैभववाडी पंचायत समिती सभापती अक्षता डाफळे, तालुका वैद्यकीय अधिकारी पवार यांनाही देण्यात आल्या. यावेळी निवेदन देताना भाजपा युवा मोर्चा ता.सरचिटणीस तथा ग्रामपंचायत सदस्य सडूरे शिराळे नवलराज काळे यांच्यासोबत उपस्थित वैभववाडी तालुका भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष किशोर दळवी जिल्हा परिषद मतदार संघाचे शक्ती केंद्रप्रमुख तथा लोरे ग्रामपंचायत सदस्य रितेश सुतार, नाधवडे ग्रामपंचायत सदस्य रोहित पावसकर होते.
यावेळी उपस्थित तालुकाध्यक्ष किशोर दळवी यांनी तहसीलदार झाळके साहेब यांच्याकडे तालुक्यामध्ये कोविड लसीकरण उपकेंद्र नुसार सुरू करण्यात यावे, कोविड लस पुरेश्या प्रमाणात उपलब्ध व्हावी, ज्या गावामध्ये नेटवर्क नाही अशा ठिकाणी ब्रॉडबँड सुविधा viccsine साठी उपलब्ध करावी.
तसेच रितेश सुतार यांनी ही लोरे पंचक्रोशी मध्ये लसीकरण सुरू व्हावे यासाठी आग्रह धरला.