You are currently viewing हत्तींकडून घोटगेवाडीत बागायतीचे नुकसान

हत्तींकडून घोटगेवाडीत बागायतीचे नुकसान

दोडामार्ग

हत्ती कडून केर,मोर्ले वायगणतडआदी गावामध्ये नुकसानी सह शेती बागायती मोठ्या प्रमाणात धुडगूस सुरु आहे तर आज अचानक दुपारी घोटगेवाडीत हत्तींनी आपला मोर्चा वळविला.केर मोर्लेतुन हे हत्ती घोटगेवाडी येथुन तिलारी नदी पाञातुन वायंगणतड गावात दाखल झाले.त्यांनीं पुन्हा नारळाची झाडे केळी बागायती सह भातशेतीची नासधूस घोटगेवाडीत केली हत्तीचां प्रवास एका गावाकडून दुसऱ्या गावात नुकसानीचा क्रम सूरू झाल्यानें शेतकरी हतबल झाले असून बंदोबस्त करण्याची मागणी करूनही वन विभाग पूर्णपणे निष्क्रिय ठरला आहे.

दोन दिवसांपूर्वी वायगणतड गावातील लोकवस्ती पासुन अगदी जवळच्या अंतरावर हत्ती वावर असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले होते वर्ष भर कष्ट करून पिकविलेल्या शेताची व नाचणी शेती खाताना व नासधूस करतांना व दिवसरात्र शेतात फिरताना दिसत आहे माञ ग्रामस्थांनी आरडा ओरडा केला परंतु हत्ती माञ जागेवर स्थिर राहत आहे घोटगेवाडीच्या दिशेने गेलेले हत्ती या भागांत स्थिर झाले असल्याने गावावस्ती पासुन जवळच असणार्‍या शेतीत आल्याने ग्रामस्थांमधे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे यावर वनविभागाने तोडगा काढुन कायमस्वरुपी हत्तींचा बंदोबस्त करावा अशी मागणी घोटगेवाडी तील शेतकरी वर्गात कडुन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा