वैभववाडी बाजारपेठ बुधवारी दुपारपासून राहणार बंद. . .
नगराध्यक्षा समिता कुडाळकर यांनी केले आवाहन.

वैभववाडी बाजारपेठ बुधवारी दुपारपासून राहणार बंद. . .

शहरात सापडलेल्या चार रुग्णांच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी बाजारपेठ आजपासून बंद राहणार आहे. तसेच पुढील आदेश येईपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय नगरपंचायत प्रशासन व व्यापारी मंडळ यांनी घेतला आहे.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नगरपंचायत व व्यापारी वर्गांनी खबरदारी म्हणून वेळीच योग्य पाऊले उचलली आहेत. संपूर्ण नगरपंचायत बाजारपेठ निर्जंतुकीकरण करणार आहेत. तसेच मेडिकल सेवा वगळता इतर सर्व आस्थापने बंद राहणार असल्याची माहिती नगराध्यक्षा समिता कुडाळकर यांनी दिली. तसेच नागरिकांनी महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असेही आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा