सावंतवाडी तालुक्यात ६ ते १५ मे या काळात जनता कर्फ्यू…

सावंतवाडी तालुक्यात ६ ते १५ मे या काळात जनता कर्फ्यू…

सर्वपक्षीय बैठकीत स्वयंस्फूर्तीने निर्णय; आमदार केसरकर यांची माहिती

सावंतवाडी

कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रूग्णसंख्या देखील वाढत असून सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, व्यापारी यांच्या उपस्थितीत तालुक्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात ६ ते १५ मे पर्यंत १० दिवसांचा कडक लॉकडाऊन राहणार आहे. मेडिकल वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद राहणार आहे. तर पुढील दोन दिवस बाजारपेठा सुरू राहणार असून जनतेन खरेदी करून द्यावी, अस आवाहन माजी पालकमंत्री आ. दीपक केसरकर यांनी केल. तर दोडामार्ग, वेंगुर्ला तालुक्यात देखील अशाच प्रकारच लॉकडाऊन संबंधित प्रशासनाशी चर्चा करून करण्यात येईल अशी माहिती आ. दिपक केसरकर यांनी दिली.

आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक तहसीलदार कार्यालयात पार पडली. यावेळी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, नगराध्यक्ष संजू परब, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रोहीनी सोळंके, तहसीलदार राजाराम म्हात्रे, पोलिस निरीक्षक शशिकांत खोत, कॉग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, सभापती निकिता सावंत, बांदा पोलिस निरीक्षक श्री. जाधव, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, सीओ जयंत जावडेकर, बांदा सरपंच अक्रम खान, पंचायत समिती बिडीओ विनायक नाईक, वैद्यकीय अधिक्षक डॉ,उत्तम पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, कॉग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, डॉ. राघवेंद्र नार्वेकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर, बाळा बोर्डेकर, देवा टेंमकर, बाबु कुडतरकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा