You are currently viewing विद्यार्थ्यानी निर्वाह भत्याची 60 टक्के रक्कम वजा करुन उर्वरित रक्कम महाविद्यालयात जमा करावी

विद्यार्थ्यानी निर्वाह भत्याची 60 टक्के रक्कम वजा करुन उर्वरित रक्कम महाविद्यालयात जमा करावी

विद्यार्थ्यानी निर्वाह भत्याची 60 टक्के रक्कम वजा करुन उर्वरित रक्कम महाविद्यालयात जमा करावी

 सिंधुदुर्गनगरी

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीची सन 2021-22 व सन 2022-23 वर्षातील केंद्र शासनाची 60 टक्के रक्कम विद्यार्थ्याच्या आधार संग्लन बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही सूरु आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील ज्या विद्यार्थ्याच्या खात्यात अशी रक्कम जमा झाली आहे अथवा काही दिवसांत जमा होणार आहे. अशा विद्यार्थ्यानी त्या रक्कमे मधुन निर्वाह भत्याची 60 टक्के रक्कम वजा करुन उर्वरित रक्कम महाविद्यालयात जमा करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.

 केंद्र शासनाने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासननिर्णयात नमूद केल्यानुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची 60 टक्के हिस्याची रक्कम महाडीबीटी प्रणालीव्दारे विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा झाल्यानुसार विद्यार्थ्यानी त्यांना अनुज्ञेय असलेल्या निर्वाह भत्ताची रक्कम वजा करुन उर्वरित शिक्षण शुल्क,परीक्षा शुल्क, इतर ना परतावा शुल्काची रक्कम संबंधित महाविद्यालयास 7 दिवसांच्या आत जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रमाणे कार्यवाही न केल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी संबंधित विद्यार्थ्याची राहील याची नोंद घ्यावी, असे प्रसिध्दी पत्रकात नमूद आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − seven =