जॅक सुटल्याने बोट अंगावर पडून कामगाराचा मृत्यू…

जॅक सुटल्याने बोट अंगावर पडून कामगाराचा मृत्यू…

कर्ली खाडीपात्रालगत एक हाऊस बोट किनाऱ्यावर आणत असता अचानक जॅक सुटून अपघात घडला. बोट अंगावर पडल्याने संतोष सूर्यकांत सारंग वय वर्षे ४४ रा. धुरीवाडा या कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना दुपारी घडली. याबाबत निवती पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

कर्ली खाडीपात्रालगत असलेली एक हाऊसबोट किनाऱ्यावर आणण्याचे काम दुपारी सुरू होते. याचदरम्यान अचानक बोटला लावलेला जॅक अचानक सुटल्याने बोट संतोष सारंग या कामगाराचा अंगावर पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच निवती पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल साळुंखे यांच्यासह श्री. कदम अन्य पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक श्री. साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. कदम, श्री. नाईक तपास करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा