वेंगुर्लेत ‘उमेद‘ तर्फे कोविड रुग्णांसाठी फोनद्वारे मोफत समुपदेशन…

वेंगुर्लेत ‘उमेद‘ तर्फे कोविड रुग्णांसाठी फोनद्वारे मोफत समुपदेशन…

वेंगुर्ला

कोविड-१९च्या पहिल्या लाटेत प्रभावी ठरलेला ‘उमेद वेंगुर्ला‘ हा उपक्रम पुन्हा जनतेच्या हाकेला साथ देण्यासाठी सिद्ध झाली आहे. गृह विलगीकरणात असणा-या रुग्णांना किवा कोविड आजाराची लक्षणे असणा-या व्यक्तींना उपचाराची आवश्यकता असल्यास दूरध्वनी व व्हाटस्पॲपच्या माध्यमातून वेंगुर्ल्यातील तज्ज्ञ डॉक्टर मोफत उपचार व मार्गदर्शन सल्ले देणार आहेत. तर ‘माझा वेंगुर्ला‘चे तज्ज्ञ समुपदेशक व कार्यकर्ते या आजारातील रुग्णांना मानसिक तणावापासून मुक्त होण्यासाठी समुपदेशन करणार आहेत.

वेंगुर्ला येथे सामाजिक काम करणारी ‘माझा वेंगुर्ला‘ संस्था व वेंगुर्ला मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची सविस्तर रचना व निश्चिती करण्यासाठी डॉ.प्रल्हाद मणचेकर, डॉ.राजेश्वर उबाळे, डॉ.अश्विनी माईणकर, डॉ.प्रसाद साळगावकर, डॉ. मिलिद काळे, डॉ.सुरेखा काळे, डॉ.शिवशरण तर ‘माझा वेंगुर्ला‘ सदस्य राजन गावडे, कपिल पोकळे, खेमराज कुबल, मोहन होडावडेकर आदी उपस्थित होते.

जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेच्या सहयोगाने घेण्यात येणा-या उपक्रमात कोरोना बाधीत रुग्णांना उपचार मार्गदर्शन, आजारात घ्यावयाची काळजी, कुटुंबातील इतर सदस्यांनी घ्यावयाची काळजी, लसिकरण गैरसमज, रुग्णालयात भरती होण्याच्या आवश्यकते संदर्भात मार्गदर्शन, मानसिक तणाव निवारणाबाबत तसेच या आजारानंतर घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. गरजू व्यक्तींनी कार्यक्रम समन्वयक मोहन होडावडेकर (९४२३८८४५१६), शशांक मराठे (९६८९९०३३७९), ओंकार तुळसुलकर ९०९६७२८२००, समृद्धी मळेकर (९०४९१४४४५४), नम्रता नेवगी (९४०३८०२३४४) यांच्याशी संफ साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा