You are currently viewing कोरोना पेशंटची गोव्यातून महाराष्ट्राच्या सीमेवर एन्ट्री…

कोरोना पेशंटची गोव्यातून महाराष्ट्राच्या सीमेवर एन्ट्री…

 प्रशासनानं उधळला त्यांचा प्लान

बांदा

महाराष्ट्र-गोवा सीमेवर ४ कोरोनाबाधीत रुग्ण आढळलून आले. कोरोनाबाधीत असलेले हे रूग्ण गोव्यातुन अहमदनगर येथे जाण्यासाठी आले होते. महाराष्ट्र – गोवा सीमेवर या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची एन्ट्री झाली अन् तपासणी नाक्यावरील सर्वांनाच घाम फुटला.

शासकीय यंत्रणेची कर्तव्यदक्षता

गोव्यातून आलेले हे कोरोनाबाधित रूग्ण तपासणी नाक्यावर उतरले. दुपारच्या सुमारास ही घटना घडली. त्यात तब्बल ४ कोरोनाबाधित तरुण होते. यावेळी उपस्थित कर्तव्य दक्ष पोलिसांनी व आरोग्य सेवकांनी गोव्यातुन महाराष्ट्रात शिरकाव करायचा त्यांचा डाव हाणून पाडला. त्वरीत तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना संपर्क केला. त्या ॲम्बुलन्समधील कोरोना बाधित नागरिकांना पुन्हा गोव्यातच विलगीकरण राहण्याचा सल्ला देण्यात आला. अखेर त्यांना पुन्हा माघारी गोव्यात राहत्या निवासस्थानी समजूत घालून पाठवण्यात आलं. महाराष्ट्र सीमेवरील या जबाबदारीच्या आणि कर्तव्यदक्ष कामगिरीचा सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

संजू विर्नोडकर यांची तत्परता

याच वेळी गोवा राज्यात कोरोना प्रतिबंधक फवारणी करण्यास गेलेल्या सामाजिक कार्यकर्ते संजू विर्नोडकर टीमची कल्पना पोलीस यंत्रणेला होती. त्यांनी ताबडतोब संजू विर्नोडकर यांना संपर्क करून पाचारण केले. संजू विर्नोडकर, सागर मळगावकर, बंटी जामदार, ज्ञानेश्वर पाटकर ,मंदार पिळणकर व भूषण नाईक यांनी संपूर्ण चेक पोस्ट आरोग्य तपासणी विभाग पोलीस कक्ष व संपूर्ण परिसर हा करोना प्रतिबंधक फवारणी करून निर्जंतुकीकरण केला. याऩंतर आरोग्य व पोलिस यंत्रणेच्या सेवकांनी सुटकेचा निश्वास सोडला. संजू विर्नोडकर टीमच्या या तत्परतेबद्दल सर्व चेक पोस्टवरील आरोग्य आणि पोलीस यंत्रणेतील सर्वानी कौतुक केले आणि आभार मानले. तर बांदा सरपंच अक्रम खान यांनी संजु विर्नोडकर याच्या सामाजिक सेवेची प्रशंसा करून आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − 4 =