You are currently viewing 18 ते 44 वयोगटातील लसीकरण 4 मे पासून

18 ते 44 वयोगटातील लसीकरण 4 मे पासून

सिंधुदुर्गनगरी 

महाराष्ट्र राज्यामध्ये 18 ते 44 वर्षे वयोगटातील सर्व नागरीकांसाठी 01 मे 2021 पासून कोवीड -19 प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली आहे. याकरीता महाराष्ट्र शासनामार्फत लस उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याकरीता 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरीकांच्या लसीकरणासाठी 5000 डोसेस लस उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यामध्ये सदरील लसीकरणास मंगळवार दिनांक 04 मे 2021 पासून सुरुवात होत आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालय / उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी सदरील लसीकरण सत्र सुरु होणार आहे. सध्या सुरु असलेल्या  45 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरण सत्राव्यक्तिरिक्त सदरील लसीकरण सत्र असणार आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी COWIN  पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करुनच व सत्राची तारीख व वेळ निश्चित करुनच लसीकरण सत्राच्या ठिकाणी उपस्थित राहावे व लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + 17 =