आज संध्याकाळी मुख्यमंत्री जनतेशी पुन्हा संवाद साधणार..

आज संध्याकाळी मुख्यमंत्री जनतेशी पुन्हा संवाद साधणार..

काय बोलणार आहेत मुख्यमंत्री आजच्या संवादात? काय असतील पुढील घोषणा?

 

महाराष्ट्रातील जनतेशी पुन्हा एकदा  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी  संवाद साधणार आहे. राज्यातील वाढता कोरोना, लॉकडाऊन, कोरोना लसीकरण या मुद्द्यांवर उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधण्याची शक्यता आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे एखादी महत्त्वाची घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे.

उद्या 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज (30 मे 2021 )उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला संबोधित करतील. फेसबुक लाईव्हद्वारे ते राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री आज नेमकं काय संवाद साधणार याकडे सर्व जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

राज्यातील वाढत्या कोरोनामुळे महाराष्ट्रातील लॉकडाऊन आणखी 15 दिवसांनी वाढवण्यात आला आहे. तर दुसरीकडे देशभरात उद्यापासून 18 वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लसीकरण केले जाणार आहे. या सर्व मुद्द्यांवर उद्धव ठाकरे आज बोलण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा