खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राला अँब्युलन्स देणार…

खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राला अँब्युलन्स देणार…

– पालकमंत्री उदय सामंत

​खारेपाटण : ​

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत असलेली कोरोनाची रुग्ण संख्या व प्रत्येक दिवसाला होत जाणारी मृत्यूची संख्या लक्षात घेता देवगड व वैभववाडी येथे ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी कणकवली तालुक्यातील खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कोविड लसीकरण केंद्राला भेट दिल्यानंतर प्रसार मध्यमाशी बोलताना केली.

यावेळी त्यांच्या समवेत खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते संदेश पारकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेश खलीपे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.नितीन कटेकर, कणकवली तहसीलदार आर जे पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय पोळ, कणकवली गट विकास अधिकारी अरुण चव्हाण, शययक पोलीस निरीक्षक संजय लाड, सागर खंडागळे, महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री पाटील, मंडल अधिकारी मंगेश यादव, ग्रामविकास अधिकारी जि सी वेंगुर्लेकर, खारेपाटण विभाग शिवसेना प्रमुख महेश कोळसुलकर, दया कुडतरकर, शिवाजी राऊत, वैभव कांबळे, गिरीश पाटणकर, संतोष गाठे, तेजस राऊत, प्रदीप इसवलकर तसेच खारेपाटण प्राथमिक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रिया वडाम, डॉ.पूजा ताडे अफी अधिकारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री उदय सामंत यावेळी खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन येथील कोविड लसीकरण केंद्राची पाहणी केली. तसेच उपस्थित अधिकाऱ्यानं समवेत मिनी बैठक घेऊन जिल्ह्यातील सध्य परिस्थितीतील कोरोनाचा आढावा घेतला.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेश खलीपे यानी सध्याची जिल्ह्याची कोरोना विषयी माहिती दिली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी खारेपाटण ग्रामस्थांची मागणी लक्षात घेता येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ​७ ​ते ​८ दिवसात तातडीने प्रधान्याने नवीन अंबुलन्स देण्यात येईल असे सांगितले. तसेच कणकवली तालुक्यातील कासार्डे प्रा आ केंद्र येथील ट्रामा केअर सेंटर लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने विचार सुरु आहे. व कणकवली येथे जसा ऑक्सिजन प्लांट उभा केला त्याच धर्तीवर देवगड व वैभववाडी येथे सुद्धा तातडीने ऑक्सिजन प्लांट उभा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
खारेपाटण विभाग येथील शिवसेना कार्यकर्त्यांचा वतीने यावेळी खासदार विनायक राऊत व पालकमंत्री उदय सामंत यांना खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विकास कामांसाठी निधी मिळावा या मागणीचे लेखी निवेदन खारेपाटण – तळेरे शिवसेना विभाग प्रमुख महेश कोळसुलकर यांनी दिले.

खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी येथील कोविड लदीकरण केंद्रावर ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या पुरविल्या जातील असे सांगितले. तसेच ​१०८ ही ​​अँब्युलन्स​ ​ खारेपाटण येथे देण्याबाबत सुद्धा कार्यवाही करण्यात येईल असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा