तालुक्यात आयसोलेशन वार्ड उभारावेत, जिल्हा रूग्णालयावरील ताण कमी होईल

तालुक्यात आयसोलेशन वार्ड उभारावेत, जिल्हा रूग्णालयावरील ताण कमी होईल

मंगेश तळवणेकर व देव्या सूर्याजी यांची प्रांताधिकारी खांडेकर यांच्याकडे मागणी

सावंतवाडी

सध्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता तालुक्याच्या ठिकाणी आयसोलेशन वार्ड उभा करावेत त्यामुळे जिल्हा रुग्णालयावरील ताण कमी होईल तसेच तसेच रुग्णांवर तात्काळ उपचार मिळतील व लोकांचे प्राणही वाचतील यासाठी तालुक्याच्या ठिकाणी आयसोलेशन वार्ड उभे करावेत अशी मागणी विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर व युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष दुर्गेश उर्फ देव्या सूर्याजी यांनी निवेदनाद्वारे प्रातांधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडे मागणी केली आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा