You are currently viewing समाजाच्या जडणघडणीत महिलाशक्तीचे मोठे योगदान”… उपायुक्त सौ. सुवर्णा पवार

समाजाच्या जडणघडणीत महिलाशक्तीचे मोठे योगदान”… उपायुक्त सौ. सुवर्णा पवार

“समाजाच्या जडणघडणीत महिलाशक्तीचे मोठे योगदान”… उपायुक्त सौ. सुवर्णा पवार

सावंतवाडी

कुटुंबाचा सर्वागीण विकास हा सामाजिक जडणघडणीत अतिशय महत्त्वाचा असून आज लाखो महिला आपलं कुटुंब सांभाळून विविध क्षेत्रात अतिशय प्रभावीपणे आपले कर्तव्य पार पडत आहेत. महिलाशक्तीची देशाच्या सर्वागीण विकासात महत्त्वाची भूमिका असून सुसंस्कृत समाज निर्मीतीत महिलांचे मोठे योगदान आहे. महिलांचा सहभाग आणि महिलासबलीकरण यासाठी शासनाने महिला धोरण निश्चित केले असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सामाजिक संस्थानेही सहकार्य करावे असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या उपायुक्त सौ. सुवर्णा पवार यांनी केले.
जिल्ह्यात कार्यरत असलेल्या महिला समुपदेशन केंद्राचे कामकाज आणि समस्या जाणून घेण्यासाठी त्यांचा दौरा असून समुपदेशन केंद्र चालवणाऱ्या संस्था व समुपदेशक यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करून माहिती घेतली.
यावेळी अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. नकुल पार्सेकर, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे श्री उमेश गाळवणकर,महिला मंडळाच्या सौ. सुषमा कुलकर्णी व तिन्ही समुपदेशन केंद्राच्या समुपदेशकांनी सौ. पवार यांचे स्वागत केली. अॅड पार्सेकर व श्री गाळवणकर यांनी जिल्ह्यात कौटुंबिक समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या असून केसेसची संख्याही वाढलेली आहे त्यासाठी समुपदेशन केंद्राना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणे तसेच मोठ्या क्षेत्रफळाच्या जागेची सोय करणे आवश्यक असल्याचे उपायुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. मा. सौ. पवार यांनी सर्व समस्या व अडचणी ऐकून घेऊन त्याबाबत आपण वरिष्ठ स्तरावर अहवाल सादर करुन अडचणी दूर करण्याबाबत आश्वस्त केले. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री मा. अदिती तटकरे यांच्या सुचनेनुसार हा दौरा असल्याने महिला समुपदेशन केंद्राच्या अडचणी दूर करण्यासाठी निश्चितच सकारात्मक विचार होईल असा आशावाद समुपदेशन केंद्राचे संचालक श्री गाळवणकर व पार्सेकर यांनी व्यक्त केला असून सुमारे दोन तासाहून जास्त वेळ चाललेल्या या चर्चेत मा. उपायुक्त मॅडमनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला याबद्दल त्यांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा