नववर्ष

नववर्ष

नववर्ष

किती छान नातं असतं,
डिसेंबर अन जानेवारीचं,,
काहीच दिवसांची सोबत असते,
आठवणींचं गाठोडं बांधायचं..

एकाला विरहाचं दुःख,
तर दुसऱ्याला भेटीचा आनंद,,
काहीच समजत नाही दोघांनाही,
भेटताना हसायचं की रडायचं?…

जुन्या कटू आठवणी त्या,
डिसेंबरही सोबत नेत नाही..
जानेवारीतल्या आनंदालाही,
आठवणींची सर येत नाही.

जानेवारीने केलेले वादे,
डिसेंबर पुरे करून जातो..
पुन्हा नवी स्वप्न पाहण्या,
मोहोर पालवीतून डोकावतो..

रात्रीतली नशा आनंदाची,
पहाटेच्या धुक्यात विरून जाते..
सोनेरी किरणांनी रवीच्या,
नव्या वर्षांची चाहूल लागते…
नव्या वर्षांची चाहूल लागते…!!

(दिपी)✒
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा