You are currently viewing ते दिवस….

ते दिवस….

ते दिवस

ती कालची सकाळ,
आणि,,,
आजची सकाळ…
काही तासांचा फरक..
आज काही अटी,
काही शर्थी..
मन मात्र बेचैन.
नियतीसमोर,
काहीच चालत नाही.
नियती जसं ठेवेल,
तसंच रहायचं.
मनातलं दुःख,
मनातच लपवायचं.
वेळ प्रसंगी,
गिळूनही टाकायचं.
हास्य चेहऱ्यावर उमटतं,
कधी खरं कधी खोटं,
उसनं हसू आणून,
खिदळत बसायचं.
जे गेले ते दिवस,
खूप चांगले होते.
आता….
येणाऱ्या दिवसांच्या,
प्रतीक्षेत जगायचं..!!

(दीपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × two =