You are currently viewing भुईबावडा घाट मार्गात पोलीस तपासणी नाका सुरु करा – भालचंद्र साठे

भुईबावडा घाट मार्गात पोलीस तपासणी नाका सुरु करा – भालचंद्र साठे

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने घ्यावा निर्णय

वैभववाडी
सद्यस्थितीत भुईबावडा घाट मार्गे जिल्ह्यात विनापास राजरोस वाहतूक सुरू आहे. अशीच वाहतूक सुरू राहिल्यास जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ शकते. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून भुईबावडा घाट मार्गात तात्पुरत्या स्वरूपात पोलीस चेक नाका उभारण्यात यावा. अशी मागणी भाजपा जिल्हा चिटणीस भालचंद्र साठे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

करुळ व भुईबावडा हे दोन प्रमुख घाटमार्ग आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकण यांच्यातील प्रमुख दुवा म्हणून या घाटांकडे पाहिले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करूळ चेक नाक्यावर कडेकोट पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. विनापास वाहतुकीवर आळा बसावा यासाठी करूळ चेक नाक्यावर एपीआय दर्जाचे अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्याचबरोबर आरोग्य पथकही तैनात करण्यात आले आहे.

मात्र दुसरा भुईबावडा घाट पोलीस प्रशासनाने रामभरोसे ठेवला आहे. करूळ चेक नाक्यावरील पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी मुंबई, पुणे व कोल्हापूरहून जिल्ह्यात येणारे प्रवासी कोरोना टेस्ट न करता व विनापास भुईबावडा घाट मार्गे उतरत आहेत. ही परिस्थिती अशीच राहिल्यास त्याचे गंभीर परिणाम जिल्ह्याला भोगावे लागतील. त्यामुळे या घाट मार्गात चेक नका झाल्यास आपोआप विनापास होणारी वाहतूक यावर आळा बसेल असे पत्रकात भालचंद्र साठे यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − seventeen =