सिंधुदुर्ग जिल्हा काॅग्रेसच्या वतीने कोव्हिड मदत केंद्राची स्थापना

सिंधुदुर्ग जिल्हा काॅग्रेसच्या वतीने कोव्हिड मदत केंद्राची स्थापना

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. या संकटाच्या काळात कोव्हिड रुग्णाना मदत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने मदतकेंद्राची स्थापना करण्यात आली आहे. तसेच कोव्हिड च्या गरजू रूग्णाना रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी कोव्हिडच्या गरजू रुग्णानी तसेच रुग्णांच्या नातेवाईकांनी मदतीसाठी मदतकेंद्राशी खालील नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे, उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख व महिला काँग्रेसच्या अध्यक्षा साक्षी वंजारी यांनी केले आहे.
1) इर्शाद शेख 9404598091
2) समीर वंजारी 9822454023
3) राजेंद्र मसूरकर 9422435760
4) विजय प्रभू 8888008112
5) किरण टेंबूलकर 9422580275
6) विधाता सावंत 9422077515
मदतकेंद्राचा पत्ता – काँग्रेस कार्यालय
तहसीलदार कार्यालय समोर
सावंतवाडी

प्रतिक्रिया व्यक्त करा