You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे संस्थेमार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शासकीय स्पर्धा परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार

तिमिरातुनी तेजाकडे संस्थेमार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शासकीय स्पर्धा परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनुक्रमे सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला, कुडाळ, मालवण, देवगड, कणकवली, वैभववाडी या आठ तालुक्यांमध्ये दिनांक 20 ते 28 फेब्रुवारी 2021 च्या दरम्यान शैक्षणिक व्याख्यानाचा एक प्रयोगशील भाग म्हणून प्रत्येक तालुक्यात तीन व्याख्यान याप्रमाणे एकूण २५ ऐतिहासिक व्याख्यानमाला पार पडले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्याध्यापक संघटना आणि पदाधिकारी व त्याचसोबत काही परिवर्तनशील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन सदर व्याख्यानमालेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून आयोजनासाठी पुढाकार घेतला.

श्री सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार तसेच संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे यांनी ONE MAN SHOW स्वरूपात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण २५ निशुल्क ऐतिहासिक व्याख्याने घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात एक नोंद केली. त्यांचा जीवन प्रवास, यशोगाथा, विविध पदव्या, स्पर्धा परीक्षांच्या मुख्य घडामोडींवर अमुल्य मार्गदर्शन यामुळे शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच शिक्षकवर्ग मंत्रमुग्ध झाले.

त्यांच्या या सामाजिक कार्याची पोचपावती विद्यार्थ्यां द्वारे स्वहस्ताक्षरात पत्रांद्वारे प्रतिक्रिया प्राप्त होऊन मिळत आहेत.

सर्वच स्तरातून या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक होत असून, येत्या भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे विविध शासकीय पदांवर निवड करण्यासाठी व शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी तिमिरातुनी तेजाकडे उपक्रमाचे संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक श्री सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार यांनी ही ज्ञानगंगा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावात नेण्यासाठी कार्य सुरू केले आहे.

विद्यार्थ्यांना विविध निशुल्क मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी 9969657820 (सत्यवान रेडकर), 9768738554 (सचिन रेडकर), 9421266810 (दशरथ शिंगारे सर, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक) या क्रमांकावर कॉल तसेच व्हाट्सअप च्या माध्यमाने संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + one =