You are currently viewing पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडीत वृक्ष लागवड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडीत वृक्ष लागवड

भाजपच्या वतीने आयोजन.

वैभववाडी :

वैभववाडी भाजपच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडीत वृक्ष लागवड करण्यात आली. वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

वैभववाडी पंचायत समिती परिसर, ग्रामीण रुग्णालय, तहसील कार्यालय, पोलीस ठाणे परिसरात भाजपा कार्यकर्त्यांनी वृक्ष लागवड केली. वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी यांच्या अध्यक्षतेखाली ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, बाळा हरयाण, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष किशोर दळवी, बंड्या मांजरेकर, हर्षदा हरयाण, शुभांगी पवार, प्राची तावडे, पुंडलिक पाटील, उन्नती पावले, संताजी रावराणे, प्रदिप नारकर आदी उपस्थित होते. नायब तहसीलदार अशोक नाईक, पोलीस निरीक्षक अतुल जाधव हे देखील वृक्ष लागवड प्रसंगी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × two =