शहरात ज्येष्ठ नागरिकांना व दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांना प्राधान्यानं लसीकरण करावं – अँड. परिमल नाईक

शहरात ज्येष्ठ नागरिकांना व दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांना प्राधान्यानं लसीकरण करावं – अँड. परिमल नाईक

लसीकरण हेच कोरोना रोखण्यासाठी एक प्रभावी माध्यम आहे हे जगाने मान्य केलेलं आहे. प्राप्त परिस्थिती मध्ये लस उपलब्धते बाबत आढावा व अवलोकन केल्यास सर्व वयोगटातील नागरिकांना एकाच वेळी लसीकरण केल्यास तुलनेने अत्याआवश्यक असा ज्येष्ठ नागरिक वयोगट व गंभीर आजाराने त्रस्त नागरिक लसीकरणापासून वंचीत राहतील किंवा विलंब होईल. सबब प्रथम ज्येष्ठ नागरिकांना तसेच दुर्धर आजाराने त्रस्त नागरिकांना प्राधान्यानं लसीकरण करणं आरोग्याच्या दृष्टीने किफायतशीर ठरेल. या विषयी वैधकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील यांच्याशी अँड. परिमल नाईक यांनी संपर्क साधला असता त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व योग्य व आवश्यक उपाय योजना करू असं आश्वासन दिलं. न. प.मुख्याधिकारी यांनी सुद्धा तांत्रिक आवश्यकता भासल्यास आपण नगरपरिषद कर्मचारी उपलब्ध करून देऊ असं आश्वाशीत केलं.

प्रतिक्रिया व्यक्त करा