You are currently viewing गॅस दरवाढी विरोधात राष्ट्रवादी कॉग्रेसचे लक्षवेधी आंदोलन

गॅस दरवाढी विरोधात राष्ट्रवादी कॉग्रेसचे लक्षवेधी आंदोलन

सावंतवाडी

गॅस दरवाढीच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस कडून लक्षवेधी आंदोलन छेडण्यात आले, केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करतांना शेणाच्या गोवऱ्या पंतप्रधान कार्यालयात पोस्टाने पाठविण्यात आल्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या आदेशानुसार महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. येथील जुन्या पंचायत समिती इमारतीच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन छेडण्यात आले, यावेळी केद्र सरकारचा निषेध करतांना उपस्थित महिलांनी शेणाच्या गोवऱ्या पंतप्रधान कार्यालयात पाठविण्यात आल्या. यावेळी माजी जिल्हा अध्यक्ष सुरेश गवस, प्रांतिक सदस्य उदय भोसले, तालुका अध्यक्षा रिद्धी परब, सावंतवाडी शहराध्यक्षा अनसरीन मकानदार, जिल्हा कार्यकरिणी सदस्य रोहिणी सावंत, रंजना निर्मळ, स्नेहा शिवलकर, रिया खोटलेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा