You are currently viewing कणकवली शहरासाठी आणखी लसीकरण केंद्र द्यावे!

कणकवली शहरासाठी आणखी लसीकरण केंद्र द्यावे!

शहर शिवसेनेने केली प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी!

कणकवली

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात कोव्हीड लसीकरण साठी तोबा गर्दी होत असल्यामुळे शहरातील कोरोना लसीकरणासाठी कणकवली कॉलेज मध्ये आणखी एक लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी कणकवली शहर शिवसेनेच्या वतीने आज प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्याकडे करण्यात आली.

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरणासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्यामुळे सोशल डिस्टन्स चा फज्जा उडत आहे. शहरात उपजिल्हा रुग्णालय हे एकच लसीकरण केंद्र असल्यामुळे मोठी गर्दी उसळते. त्यामुळे वाढती गर्दी विभागण्यासाठी शहरात कणकवली कॉलेजमध्ये आणखी लसीकरण केंद्र मंजूर करावे अशी मागणी शहर शिवसेनेच्या वतीने गटनेता सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर, शहर शाखाप्रमुख शेखर राणे यांनी केली.

यावेळी तहसीलदार रमेश पवार, तालूका आरोग्य अधिकारी डॉ संजय पोळ यांची प्रमुख उपस्थिती होती. लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना कॉलेजच्या वर्गखोल्यांमध्ये बसवून ठेवण्याची व्यवस्था करता येईल. त्यामुळे नागरिकांचा उन्हातान्हात उभे राहण्याचा त्रासही वाचेल अशी सूचना नगरसेवक कन्हैया पारकर यांनी केली. आरोग्य विभागाशी चर्चा करून याबाबत तात्काळ निर्णय घेण्याचे प्रांताधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.

यावेळी कणकवली विधानसभा संघटक सचिन सावंत, राजू शेट्ये, राजू राठोड, उमेश वाळके, रिमेश चव्हाण, तेजस राणे, अमित मयेकर, राजन म्हाडगुत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + nine =