चौकुळ केगदवाडी, कुंभवडे नागरिकांसाठी आंबोली येथे लसिकरण.

चौकुळ केगदवाडी, कुंभवडे नागरिकांसाठी आंबोली येथे लसिकरण.

रूपेश राऊळ यांचे संपर्काचे आवाहन

आंबोली

जिल्ह्यात सद्य स्थितीत कोरोना लसीकरण ठीक ठिकाणी सुरू असून, वाहतूक बंद असल्याने काही दुर्गम भागातून लस घेण्यासाठी २० किलोमीटर प्रवास करून जावे लागत आहे. परंतु हा प्रवास खाजगी वाहनाने करणे गावातील गरीब जनतेला शक्य नाही आहे. त्यामुळे शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी चौकुळ केगदवाडी व कुंभवडे या भागासाठी ही लस आंबोली येथे उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या भागातील ज्या नागरिकांना लस घेण्यासाठी जायचे आहे त्यानी स्थानिक शिवसेना कार्यकर्ते रुपेश गावडे नेनेवाडी, अरुण गावडे चौकुळ, अभिजित मेस्त्री चौकुळ, विजय गावडे कुंभवडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आंबोली येथे लस घेण्यासाठी यांच्यामार्फत वाहन उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा