You are currently viewing पद्मभूषण शास्त्रीय गायक पंडित राजन मिश्रा यांचे कोरोनाने निधन

पद्मभूषण शास्त्रीय गायक पंडित राजन मिश्रा यांचे कोरोनाने निधन

 

नदीम-श्रवण या जोडीतील श्रवण अर्थात श्रवणकुमार राठोड यांनी दोन दिवसापूर्वीच जगाचा नुकताच निरोप घेतल्यानंतर कोरोनानं संगीत क्षेत्राला आणखी एक धक्का दिला आहे. राजन-साजन मिश्रा या प्रसिद्ध जोडीतील पद्मभूषण पंडित राजन मिश्रा यांचं नुकतंच निधन झालं.

आज रविवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास दिल्लीतील सेंट स्टीफन्स रुग्णालयात राजन मिश्रा यांनी अखेरचा श्नास घेताला. कोरोनाने त्यांचं निधन झालं.

राजन मिश्रा हे भारतातली प्रसिद्ध शास्त्रीय गायक होते. २००७ मध्ये भारत सरकारनं त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानीत केलं होतं. बनारस घराण्याच्या पं. राजन -साजन मिश्रा यांच्या जोडीनं आतापर्यंत लाखो रसिकांना मंत्रमुग्ध केलं होतं. राजन यांच्या निधनानं संगीत क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − seven =