You are currently viewing कोकिसरे ग्रा. पं. च्या वतीने शाळांना कोरोना प्रतिबंधात्मक साहित्य वाटप

कोकिसरे ग्रा. पं. च्या वतीने शाळांना कोरोना प्रतिबंधात्मक साहित्य वाटप

वैभववाडी

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर कोकिसरे ग्रामपंचायतीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक साहित्याचे वाटप ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात येणार आहे. गावातील पाच शाळांना मास्क, सॅनिटायझर, सॅनिटायझर स्टॅन्ड, थर्मलगन व आँक्सीमीटर आदी साहित्य वाटप करण्यात येणार आहे.

नारकरवाडी विद्यामंदिर शाळेत साहित्य शिक्षकांकडे सुफुर्द करण्यात आले आहे. यावेळी ग्रा.पं. सदस्य प्रदीप नारकर, सदस्य समीक्षा पाटणकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष राघोबा नारकर, शिक्षक संजय शेट्ये, दाजी पाटणकर, उमेश पाटणकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − fourteen =