You are currently viewing सावंतवाडीत नगरपालिकेच्या हेल्थपार्क मध्ये होणार कोविड सेंटर?

सावंतवाडीत नगरपालिकेच्या हेल्थपार्क मध्ये होणार कोविड सेंटर?

सावंतवाडी शहरातील महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या हेल्थफार्म येथे कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर २० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची खात्रीलायक बातमी येत असून नगरपालिकेचे डॉक्टर मसुरकर यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम, पाणीपुरवठा व विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना सावंतवाडी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
उद्या सकाळी १०.०० वाजता राज्यस्तरीय पथक जी एफ सी तपासणीसाठी येणार असून आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी आजचा रात्रंदिवस एक करावा आणि तयारी ठेवावी अशा सूचना मुख्याधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
सावंतवाडीत सुरू करण्यात येणाऱ्या या कोविड केअर सेंटर मध्ये सावंतवाडी शहरातीलच रुग्ण ठेवणार की जिल्हाभरातील रुग्ण देखील सावंतवाडीत आणून ठेवणार? असा प्रश्न सदर एरीयातील रहिवाशांना पडला आहे. ओरोस येथे सर्व सुविधांनी कोविड सेंटर असताना नगरपालिकेच्या जागेत नवीन कोविड सेंटर करणे खरोखरच गरजेचे आहे का?

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × five =