You are currently viewing माजी अणूऊर्जा शास्त्रज्ञ सुधीर वेलिंग यांचे निधन…

माजी अणूऊर्जा शास्त्रज्ञ सुधीर वेलिंग यांचे निधन…

वेंगुर्ले

मूळ वेंगुर्ले बागायत, उभादांडा येथील रहिवासी वेंगुर्ला हायस्कूलचे माजी विद्यार्थी व माजी अणूऊर्जा शास्त्रज्ञ श्री सुधीर अनंत वेलिंग यांचे पूणे येथील दिनानाथ मंगेशकर इस्पितळात काल २३ एप्रिल रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८५ होते.
काही दिवसांपूर्वी पुण्यात रस्ता अपघातानंतर त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते. वेलिंग हे मद्रास जवळील कल्पकम येथील अणूऊर्जा केंद्रात १९६५ ते १९९० दरम्यान शास्त्रज्ञ व संचालक म्हणून सेवेत होते. निवृत्तीनंतर त्यांनी पूणे येथे कायम निवास केला. ख्यातनाम अणूऊर्जा शास्त्रज्ञ डॉ सेठना यांच्याशी त्यांचा निकटचा संबंध होता. सेवेत असताना काही वर्षे प्रगत अणूऊर्जेच्या संशोधनासाठी फ्रान्सला होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा अमेरिकास्थित, दुसरा डॉक्टर मुलगा, सूना , नातवंडे आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + 9 =