You are currently viewing रेडी गणपती मंदिरात उद्या अंगारकी संकष्टी सोहळा…

रेडी गणपती मंदिरात उद्या अंगारकी संकष्टी सोहळा…

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन;भाविकांनी कोरोना नियमाचे पालन करत दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन

वेंगुर्ला

भक्तांच्या हाकेला धावणारा म्हणून प्रसिद्ध पावलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील गणपती मंदिरात अंगारकी संकष्टी चतुर्थी सोहळा मंगळवार २ मार्च रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. यानिमित्त पहाटे ५.३० वा. अभिषेक, सकाळी ६ वा. पूजापाठ, सकाळी ६.३० वा. आरती आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

कोव्हीड १९ – कोरोना प्रादुर्भावामुळे सर्व कार्यक्रम विश्वस्त व पुजारी यांच्या उपस्थितीत साजरे केले जाणार आहेत. भक्त – भाविकांनी मास्क,सॅनिटायझर, सोशल डिस्टनसिंग आदी शासन नियमांचे पालन करून तसेच गर्दी न करता श्री दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गजानन देवस्थान रेडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × four =