You are currently viewing या खंबीर नेतृत्वाचा वैभववाडी वासियांना सार्थ अभिमान : नितेश राणे यांचे नासीर काझी यांनी मानले आभार

या खंबीर नेतृत्वाचा वैभववाडी वासियांना सार्थ अभिमान : नितेश राणे यांचे नासीर काझी यांनी मानले आभार

तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी आ. नितेश राणे यांनी केले बेड उपलब्ध

वैभववाडी
तालुक्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांनी कोवीड केअर सेंटरला पहिल्या टप्प्यात 25 सुसज्ज बेड उपलब्ध करून दिले आहेत. कोरोना महामारीत तसेच या संकट काळात रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी आ. नितेश राणे यांनी दिलेले योगदान वैभववाडीतील जनता कधीच विसरणार नाही. या नेतृत्वाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. नितेश राणे यांचे तालुकावासियांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानत आहे. अशी प्रतिक्रिया वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी यांनी दिली.

आमदार नितेश राणे सामाजिक बांधिलकीने या महामारीत काम करत आहेत. पहिल्या टप्प्यात त्यांनी जिल्ह्यातील शासकीय डॉक्टर, कर्मचारी तसेच खाजगी डॉक्टर, सरपंच यांना पीपीई कीट उपलब्ध करून दिले. तसेच जिल्हावासीयांना अर्सेनिक अल्बम गोळ्याचे वाटप केले होते. गरीब, गरजू व परप्रांतीयांना त्यांनी कमळथाळी हा उपक्रम राबविला होता. तसेच परप्रांतीयांना जीवनावश्यक वस्तू पुरवल्या होत्या.

कोवीड केअर सेंटर मध्ये बेड अभावी रुग्णांचे हाल होत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास येताच, त्यांनी तात्काळ बेड उपलब्ध करुन दिले आहेत. यापुढेही रुग्णांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी त्यांच्या माध्यमातून घेतली जाईल असे काझी यांनी सांगितले.

सर्दी, ताप कोणीही अंगावर काढू नये. तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. मास्कचा वापर करा असे आवाहनही नासीर काझी यांनी नागरिकांना केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + 2 =