You are currently viewing नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुलीच्या १९८७ च्या बॅचचा स्तुत्य उपक्रम

नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुलीच्या १९८७ च्या बॅचचा स्तुत्य उपक्रम

इन्सुली

जगासमोर कोविड विषाणूचे संकट उभे राहिले आहे.जो-तो सरकारकडे मदतिच्या आशेने पाहत आहे. बऱ्याच जणांचे कोविडमुळे रोजगार गेले आहेत. आजच्या घडीला तर कोविडचे संकट खूपच गडद होत चालले असताना इन्सुली येथील नूतन माध्यमिक विद्यालयाच्या १९८७ च्या दहावीच्या बॅचने जिल्ह्यासमोर एक नवा आदर्श निर्माण ठेवला आहे.
इन्सुली-कोठावळे बांध येथील प्रकाश केरकर हे आजाराने त्रस्त आहेत. त्यांना आर्थिक मदतीची गरज होती. याबाबतची माहिती केरकर यांच्या इन्सुलितील त्यांच्या १९८७ मधील दहावीच्या वर्गमित्र-मैत्रिणींना समजली. त्यांच्या या परिस्थितीची माहिती त्यांनी १९८७ च्या दहावीच्या वर्गाच्या ग्रुपवर शेअर केली.आणि बघता-बघता या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मिळून (जे आज मुंबई, पुणे, गोवा व सिंधुदुर्ग जिल्ह्यात वास्तव्यास असणारे माजी विद्यार्थी)आपल्या जुन्या सहकारी मित्राला रुपये ३२ हजार रोख मदत केली. या त्यांच्या कोविड संकटातही केलेल्या स्तुत्य उपक्रमाचे इन्सुलि गावातून कौतुक होत आहे. अजूनही काही जणांची मदत यायची आहे, त्यांनी जमेल ती मदत प्रशांत पेडणेकर यांच्या नवे गुगल पे करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + 4 =