‘एक लढवय्या शिवसैनिक हरपला..!’

‘एक लढवय्या शिवसैनिक हरपला..!’

वैभववाडी (एडगांव) येथील रहिवासी दामोदर दत्‍ताराम रावराणे वय वर्षे ७२ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ‌भांडूप शिवसेना शाखा प्रमुख ते भांडूप विधानपरिषदेचे विभाग प्रमुख असा त्यांचा राजकारणात मोठा प्रवास होता. त्यांच्या निधनाने वैभववाडी तालुक्यासह भांडुप परिसरात शोककळा पसरली आहे. ‘एक लढवय्या शिवसैनिक हरपला !!’ अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांकडून व्यक्त केली जात आहे. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांचे ते ज्येष्ठ बंधू होतं. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, भाऊ व भावजय, पुतणे व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा