You are currently viewing वेशभूषा स्पर्धेत लहान गटात विहान गावकर तर मोठ्या गटात दुर्वेश पवार प्रथम…

वेशभूषा स्पर्धेत लहान गटात विहान गावकर तर मोठ्या गटात दुर्वेश पवार प्रथम…

हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त आयोजन ; स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद…

मालवण

हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या निमित्ताने काल घेण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेत लहान गटात विहान गावकर तर मोठ्या गटात दुर्वेश पवार याने प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लहान व मोठा अशा दोन गटात स्पर्धा घेण्यात आली. यात १०६ स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचा उर्वरित निकाल असा- लहान गट – द्वितीय- वेदांत सारंग, तृतीय- मीरा पोळ, उत्तेजनार्थ- देवदत्त शिरोडकर, भक्ती शिर्सेकर, मोठा गट- द्वितीय- जयेंद्र केळुसकर, तृतीय- विभूती ढोके, उत्तेजनार्थ- सार्थक भोगल, अवनिश मेथर
विजेत्यांना रोख पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी विजय केनवडेकर, प्रशांत हिंदळेकर, आप्पा लुडबे, श्वेता यादव, श्री. दूधवडकर, दीपा शिंदे, आकांक्षा शिरपुटे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + nineteen =