निवृत्त मुख्याध्यापक वा. रा. ढोरे यांचे निधन

निवृत्त मुख्याध्यापक वा. रा. ढोरे यांचे निधन

सावंतवाडी
सावंतवाडी येथील मूळ रहिवासी वासुदेव रामचंद्र ढोरे (८७) यांचे पुणे येथे गुरूवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेत त्यांनी मुख्याध्यापक म्हणून काम होते. डेगवे माध्यमिक विद्यालयात १८ वर्ष तर मडुरा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ४ वर्ष मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम केले. निवृत्तीनंतर त्यांनी सावंतवाडी-दोडामार्ग निवृत्त कर्मचारी संघाचे अध्यक्ष या पदावर काम केले होते. आरती मासिक-चिंतामणी साहित्य सहयोग संस्थेत खजिनदार म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे प्रसाद, प्रदीप, प्रवीण, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बांदा येथील निवृत्त शिक्षिका शुभदा ढोरे यांचे ते पती, बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी प्रदीप ढोरे यांचे ते वडील तर पल्लवी ढोरे यांचे सासरे होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा