ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, लेखक, साहित्यिक विनायकदादा पाटील यांचे निधन….

ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, लेखक, साहित्यिक विनायकदादा पाटील यांचे निधन….

 

ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, लेखक, साहित्यिक विनायकदादा पाटील यांचे काल रात्री निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईत करोनावर उपचार सुरू होते. त्यातून बरे होऊन ते नुकतेच नाशिकला घरी परतले होते. अचानक प्रकृती ढासळून त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभलेला एक नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.

 

विनायकदादा पाटील यांचा प्रवास थक्क करणारा होता. १९ ऑगस्ट १९४३ रोजी निफाड तालुक्यात शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. कुंदेवाडीचे सरपंच म्हणून त्यांनी राजकारणात श्रीगणेशा केला. त्यानंतर निफाड तालुका पंचायत समिती सभापती, निफाडचे आमदार, विधान परिषद सदस्य अशी भरारी घेत त्यांनी राज्य मंत्रिमंडळात उद्योग, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व युवकसेवा अशा विविध खात्यांच्या मंत्रिपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. सहकार क्षेत्रातही त्यांचा दबदबा राहिला.

 

कुंदेवाडी विकास कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन, नाशिक जिल्हा सहकारी भूविकास बँकेचे अध्यक्ष, निफाड सहकारी साखर कारखान्याचे संचालक, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. राज्यमंत्रिपदाच्या दर्जासह त्यांना महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्षपदही पाच वर्षे देण्यात आले होते. त्यांना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा