आरपीआय (आठवले गट)जिल्हाध्यक्ष रतन भाऊ कदम यांची पक्षनेतृत्वावर नाराजी

आरपीआय (आठवले गट)जिल्हाध्यक्ष रतन भाऊ कदम यांची पक्षनेतृत्वावर नाराजी

*अन्यथा वेगळी भूमिका घेणार…*

सिंधुदुर्ग :

सिंधुदुर्ग रिपब्लिकन (आठवले गट) पक्षाचे जिल्हाध्यक्ष रतन भाऊ कदम यांनी पक्षनेतृत्वावर नाराजी व्यक्त करत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोदी सरकार मधील मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा वेगळी भूमिका घ्यावी लागेल असा इशारा दिला आहे. मोदी सरकारवर आंबेडकरी जनता नाराज असल्याचे ते म्हणाले,

रामदास आठवले हे आमचे नेते आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची विचारधारा पटत नसतानाही केवळ रामदास आठवले यांच्यासाठी आम्ही भाजपला साथ दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तळागाळात भाजपचा उमेदवाराचा प्रचार केला. भाजप आणि आंबेडकर चळवळीचा काही संबंध नाही. महाराष्ट्रातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे रामदास आठवले यांनी भाजपा पक्षापासून दूर होत मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि पक्षवाढीसाठी काम करावं, अन्यथा आमची भूमिका वेगळी असेल, याची सुरुवात सिंधुदुर्गातून होईल, राज्यभरातील पदाधिकारी राजीनामे देतील असा इशारा दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा