You are currently viewing राजन रेडकर यांची अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती

राजन रेडकर यांची अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती

अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाची कार्यकारी सदस्यांची मुंबईतील कित्ते भंडारी हॉल, शिवजीपार्क येथे दिनांक २४ सप्टेंबर २०२२ रोजी भविष्यकालीन नियोजनबद्ध कार्यक्रमाची आढावा बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सामाजिक कार्यकर्ते राजन रेडकर यांची अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाच्या “उपाध्यक्ष” पदी नियुक्ती करण्यात आली.

महासंघाचे अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर यांनी राजन रेडकर यांना अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाच्या “उपाध्यक्ष” या पदाच्या नियुक्तीसह “भंडारी मिलिसिया”चीही अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. महासंघाच्या वतीने उपस्थित असलेल्या सर्व कार्यकरिणीतील सदस्यांनी राजन रेडकर यांच्या कार्याचे कौतुक करून अभिनंदन केले व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भंडारी समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उत्तम मोबारकर, कुणाल किनळेकर, आशिष सुभेदार, चंद्रकांत साळगांवकर, निलेश राणे, दाजी नाईक, भूषण मांजरेकर, आबा चिपकर, सौरभ नागोळकर, प्रविण भगत, रविंद्र राणे, अरुण कांबळी, सौ रीमा मेस्त्री, सौ कमल पडवळ, सिद्धेश शेलटे, राजेश सातोसकर, दया कृष्णाजी, बाबल शेलटे, मुरलीधर राऊळ, दिलीप साळगांवकर, अभय देसाई व इतर यांनी राजन रेडकर यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 3 =