जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत कासार्डेची कु. कोमल पाताडे अव्वल

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत कासार्डेची कु. कोमल पाताडे अव्वल

कासार्डे

रोटरी क्लब वेंगुर्ला मिडटाऊन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या आॅनलाईन निबंध स्पर्धेत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेची कु.कोमल शिवराम पाताडे हिने या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
रोटरी क्लब वेंगुर्लेच्यावतीने ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत जिल्हाभरातून ५० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त कु.कोमल शिवराम पाताडे कासार्डे हायस्कूल मध्ये इ.१०वीतील विद्यार्थ्यिनी असुन तीने यापूर्वीही अनेक निबंध स्पर्धेत उज्जवल यश संपादन केले आहे.या यशस्वी विद्यार्थिनीला पालकांचे व कासार्डे विद्यालयातील शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.
या गुणवंत विद्यार्थिनीचे कासार्डे विकास मंडळाचे अध्यक्ष परशुराम माईणकर, सरचिटणीस उपेंद्र पाताडे, स्थानिक समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर, स्कूल कमिटीचे चेअरमन मधुकर खाडये तसेच सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य आर.व्ही.नारकर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा