वैभववाडीत पोलिस ‘रेझिंग डे’ सप्ताह संपन्न…

वैभववाडीत पोलिस ‘रेझिंग डे’ सप्ताह संपन्न…

वैभववाडी

वैभववाडी पोलिस ठाण्याच्यावतीने पोलिस रेझिंग डे’ निमित्त कोकिसरे येथील माधवराव पवार विद्यालय, वैभववाडी बस स्टँड व बाजारपेठेतील नागरिकांना कोव्हिड विषयक मार्गदर्शन करण्यात आले.
राज्यात दरवर्षी २ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यान ‘रेझिंग डे’ सप्ताह साजरा केला जातो. शुक्रवारी वैभववाडी पोलिस ठाण्याच्यावतीने कोकिसरे माधवराव पवार विद्यालयातील विद्यार्थ्यांसह वैभववाडी बस स्टँड व बाजारपेठेतील नागरिकांना कोव्हिड विषयक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मास्कचा वापर करा, सोशल डिस्टंसिंगचे पालन करा, हात वारंवार साबण व पाण्याने धुवा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळे असेही आवाहन करण्यात आले. यावेळी वैभववाडी पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा