You are currently viewing कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ले शहरात उद्या पासून कडक निर्बंध

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ले शहरात उद्या पासून कडक निर्बंध

सकाळी ७.३० ते दुपारी १ पर्यंतच अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.

उद्या पासून दर दिवशी दुपारी १ नंतर अत्यावश्याक सेवांसाहित सर्व आस्थापने बंद राहतील व फक्त अत्यावश्यक दुकानांसाठी पार्सल सेवा सुरू राहील

वेंगुर्ले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात उद्या पासून कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. सकाळी ७.३० ते दुपारी १ पर्यंतच अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. यानंतर शहरात कडक कोरोना कर्फ्यु करण्यात आला आहे. यामुळे उद्या पासून दर दिवशी दुपारी १ नंतर अत्यावश्याक सेवांसाहित सर्व आस्थापने बंद राहतील व फक्त अत्यावश्यक दुकानांसाठी पार्सल सेवा सुरू राहील अशी माहिती मुख्याधिकारी डॉ अमितकुमार सोंडगे यांनी दिली आहे.

वेंगुर्ले शहरात वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता. व संचारबंदीला प्रतिसाद मिळत नसल्याने याबाबत आज येथील तहसील कार्यालयात प्रशासनाची तातडीची बैठक संपन्न झाली. यावेळी तहसीलदार प्रवीण लोकरे, नगराध्यक्ष दिलीप गिरप, मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे, पोलीस निरीक्षक तानाजी मोरे, गटविकास अधिकारी उमा पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विनी माईणकर- सामंत, वैद्यकीय अधिकारी डॉ मणचेकर यांच्यासाहित इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी दुपारी १ नंतर संपूर्ण कर्फ्युचा निर्णय घेण्यात आला. तसेच उद्यापासून अनावश्यक फिरणाऱ्यांवर कडक कारवाई होणार असून नाक्यावर- नाक्यावर पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे. तसेच शहरात बाजरपेठेत अनावश्यक फिरणाऱ्यांची कोरोना रॅपिड टेस्टही यावेळी मंगळवार पासून केली जाणार आहे. कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांवर येथील धावडेश्वर स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार होणार असल्याची माहितीही यावेळी मुख्याधिकारी सोंडगे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + nineteen =