You are currently viewing पत्रादेवी लाठी पुन्हा बंदचा निर्णय दुर्दैवी

पत्रादेवी लाठी पुन्हा बंदचा निर्णय दुर्दैवी

बांदा :

महाराष्ट्र – गोवा सीमेवरील पत्रादेवी लाठी प्रशासनाकडून पुन्हा बंद करण्याचा घेण्यात आलेला निर्णय हा दुर्दैवी आहे. कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रशासनाने जनजागृती करावी कायद्याचा बडगा दाखवून कोणाची अडवणूक करू नये अन्यथा बेकारी आत्महत्याचे प्रमाण वाढेल बांदा दशक दशक्रोशीतील लोकांना होणारा त्रास लक्षात घेता. जिल्हाधिकारी आणि प्रशासनाने योग्य तो तोडगा काढून सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा याबाबत आम्ही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन पुढील निर्णय घेऊ असा इशारा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा बांदा ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब यांनी दिला आहे.

बांदा सीमेवर असलेली पत्रादेवी लाठी बुधवारी सायंकाळपासून पुन्हा एकदा बंद करण्यात आलीआहे.याबाबतचे निर्णय जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले असे सांगून येथील पोलिसांनी पुन्हा त्या ठिकाणी बंद केले आहे मात्र सद्य स्थिती लक्षात घेता याचा फटका बांदा दशक्रोशीतील संपूर्ण जिल्ह्याला सहन करावा लागत आहे. एकीकडे कोरोना मुळे सगळ्यांचे हाल सुरू आहेत अशा परिस्थितीत जगायचे कसे असा प्रश्‍न सर्वांसमोर आहे त्यामुळे अशा प्रकारे लाठी बंद करण्यात आल्यानंतर नोकरीसह व्यवसायावर परिणाम होणार आहे याचा विचार प्रशासनाने करावा असे, श्री.खतीब म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा