You are currently viewing बांद्यात “रॅपिड टेस्ट” मध्ये तिघे पॉझिटिव्ह…

बांद्यात “रॅपिड टेस्ट” मध्ये तिघे पॉझिटिव्ह…

अत्यावश्यक सेवेसह बाजारपेठ उद्या बंद ; सरपंचांचा निर्णय

बांदा

शहरात आज विनाकारण फिरणाऱ्या १६ जणांची अँटिजेन रॅपिड टेस्ट केली असता त्यातील तिघे कोरोना बाधित सापडले आहेत. त्यामुळे वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी उद्या मंगळवारी एक दिवस संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा देणारी किराणा दुकाने तसेच मेडिकल स्टोअर्स देखील बंद ठेवण्यात येणार आहेत.
याबाबतचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासन, प्राथमिक आरोग्य केंद्र, व्यापारी संघ व पोलीस ठाणे बांदा यांनी संयुक्तरित्या घेतला आहे. शहरात आज कोरोना रुग्ण सापडल्याने हा निर्णय घेण्यात आला.
शहरातील सर्व दुकाने, हॉटेल व्यावसायिक, भाजीपाला दुकाने, मेडिकल स्टोसर्स यांनी सर्व आस्थापने बंद ठेऊन सहकार्य करावे असे आवाहन सरपंच अक्रम खान यांनी केले आहे. तसेच दुकान उघडे ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास १ हजार रुपये दंड आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे खान यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + fifteen =