You are currently viewing कुडाळात चोरट्यांचा धुडगुस

कुडाळात चोरट्यांचा धुडगुस

कुडाळ

कुडाळ शहरातील चौकात चोरट्यांनी धुडगुस घालत पाच दुकाने फोडली. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली , या चोरट्यांनी किरकोळ रकमेवर डल्ला मारत एका बेकरीतील केक वर येथेच्छ ताव मारला . चोरीच्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील लोकवस्ती लगत तसेच मुख्य ठिकाण दुकाने चोरट्यांनी लक्ष करत पोलिस प्रशासनाला आवाहन दिले आहे. या चोरट्यांची करामत सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे.

मध्यरात्रीघेऊन 2.45 ते 3.15 या वेळेत ही घटना घडल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट होत आहे. हे चोरटे माहिती कार आणि परप्रांतीय असल्याची शक्यता व्यवसायिक व नागरिकांनी व्यक्त केली आहे. शहरात रात्रीच्यावेळी पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू असते असे असतानाही मुख्य चौकातील ही दुकाने फोडून चोरट्यांनी कुडाळ पोलिसांना आवाहन दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा