सावंतवाडीत काँग्रेसकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी…

सावंतवाडीत काँग्रेसकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी…

रक्तदान शिबिराचे आयोजन; कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

सावंतवाडी

येथील काँग्रेसच्या वतीने आज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.दरम्यान या दिवसाचे औचित्य साधून येथील उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगीही मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत,महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी,युवक जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे, प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष अँड.दिलीप नार्वेकर,जिल्हा उपाध्यक्ष इर्शाद शेख, सरचिटणीस महेंद्र सावंत, जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोरया, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष केतन कुमार गावडे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष जगन्नाथ डोंगरे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, कणकवलीचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, युवक कार्याध्यक्ष किरण टेंबूलकर, मुंबई प्रांतिक सदस्य सुगंधा साटम, देवगड तालुका अध्यक्ष उल्हास मंचेकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष वासुदेव नाईक, मालवण तालुका अध्यक्ष मेघनाद धुरी, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा