कासार्डेतील वैजयंती मिराशी यांना मिळणार हक्काचे घर!

कासार्डेतील वैजयंती मिराशी यांना मिळणार हक्काचे घर!

 

 

जि.प.सदस्य संजय देसाई याचा पुढाकार

 

तळेरे

 

कासार्डे तर्फेवाडी येथील महीलेची करून काहणी काल‌ सर्वत्र प्रसिद्ध होताच.सदर महिलेला सर्वस्तरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.

कासार्डेतील सामाजिक कार्यकर्ते तथा जि.प.सदस्य संजय देसाई यांनी या महिलेची भेट घेत तीला घर बांधून देणार असल्याचे सांगितले आहे.

या घरबांधणीला शुभारंभ परवा म्हणजेच शुक्रवारी सकाळी 10:00 वा. करणार आहेत.यामध्ये दोन खोल्या व संडास बाथरूम सह इतर सुविधा उपलब्ध करून देणार असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

जिल्ह्य़ातील सर्व वृत्तपत्र,इलेक्ट्रॉनिक मेडीयाचे पत्रकारांचे श्री.संजय देसाई यांनी आभार मानले असून समाजाभिमुख पत्रकारीकेबदद्दल कौतुक केले आहे. यावेळी वैजयंती मिराशी याच्या घरी जात आपुलकीने चौकशी केली. यावेळी जि.प.सदस्य संजय देसाई यांच्यासह ग्रा.पं.सदस्य गणेश पाताडे,बाबी गाडे, विठ्ठल गाडे,भाऊ कोलते, गुरूप्रसाद सावंत आदी उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा