You are currently viewing मालवण शहरातील विविध विकास कामांची भूमिपूजने

मालवण शहरातील विविध विकास कामांची भूमिपूजने

आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथान महाअभियान जिल्हास्तर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलीतवस्ती सुधार योजना सन २०२०-२१ अंतर्गत मंजूर झालेल्या विविध विकास कामांची भूमिपूजन गुरुवारी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.

यामध्ये भरड भाट येथील चिपकर घर रस्ता डांबरीकरण व गटार बांधकाम निधी (६,२३,२९९), बसस्थानक ते दलीतवस्ती रस्ता रुंदीकरण करणे, पेव्हर ब्लॉक बसवणे व डांबरीकरण (१५,८१,३५९), मालवण बस स्थानक समोरील दलीतवस्ती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण (१३, ९१,९४६), हॉटेल महाराजा ते दलीतवस्ती रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण (२३,७६,९९६), या कामांचा समावेश आहे. अशी माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व बांधकाम सभापती मंदार केणी यांनी दिली.

यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, महिला संघटक पूनम चव्हाण, शहर प्रमुख बाबी जोगी, माजी बांधकाम सभापती तथा नगरसेवक यतीन खोत, युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, नगरसेवक आप्पा लुडबे, नगरसेविका पुजा करलकर, नगरसेविका तृप्ती मयेकर, आकांक्षा शिरपुटे, सुनीता जाधव, अंजना सामंत, बाळू अंधारी, उमेश मांजरेजर, किसन मांजरेजर, बाळू नाटेकर, प्रसाद आडवणकर, अमेय देसाई, आबा खोत यांसह नागरिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + one =