You are currently viewing राज्यात एसटीचे स्टेअरिंग आता महिलांच्याही हाती

राज्यात एसटीचे स्टेअरिंग आता महिलांच्याही हाती

मुंबई

एसटीटी महामंडळात वाहक महिला असतानाच येत्या वर्षभरात 215 महिला चालक कम वाहक म्हणून सेवेत येणार आहेत.यात 21 आदिवासी महिला आहेत.एसटीत चालक-वाहक म्हणून प्रथमच महिलांची नियुक्ती होणार आहे. त्यांचे प्रशिक्षण सुरू असून वर्षभरात एसटीचे स्टेअरिंग महिला चालकांच्या हातात असेल.

एसटीत सध्या 4,500 महिला वाहक आहेत. आता चालक म्हणूनही महिला काम करतील. महिलाचालकांची भरती प्रक्रिया वर्ष 2019 मध्ये झाली. त्यासाठी 600 अर्ज आले होते. कागदपत्रांची छाननी करून त्यातून सर्वसाधारण भागातील 194 तर आदिवासी भागातील 21 महिलांची निवड झाली. प्रशिक्षणानंतर शिकाऊ अनुज्ञप्ती (लायसन्स) प्रशिक्षण आणि अंतिम चाचणीनंतर महिलाचालक 2021 मध्ये सेवेत रुजू होणे अपेक्षित होते.

परंतु कोरोनामुळे त्यांचे प्रशिक्षण रखडले. आता या उमेदवारांचे 1 वर्ष अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण पुन्हा सुरू झाल्याने वर्षभरात त्या सेवेत दाखल होतील. पुण्यातील भोसरी येथे एसटीचे टेस्टिंग ट्रक आहे, तेथे अंतिम चाचणी होऊन त्यांची अंतिम निवड होणार आहे.सुरुवातीला त्यांना कमी अंतराच्या मार्गावरच काम दिले जाईल.

  1. आदिवासी महिलांना रोजगार मिळावा

आदिवासी भागातील महिलांना रोजगार मिळावा म्हणून एसटीत चालक-वाहक पदांसाठी आदिवासी आणि दुष्काळग्रस्त भागातील महिलांची निवड करण्याचा निर्णय माजी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी घेतला होता. त्यानुसार 21 महिला आदिवासी भागातील आहेत.या महिला यवतमाळ येथील स्थानिक असून तेथेच त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 3 =