मुंतजिमा कमिटी कब्रस्तान सावंतवाडी च्या वतीने पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन

मुंतजिमा कमिटी कब्रस्तान सावंतवाडी च्या वतीने पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन

पालकमंत्री फंडातून कबरस्तान ईदगाह पर्यंत च्या डांबरीकरण रस्त्याची केली मागणी

सावंतवाडी

सावंतवाडीच्या दौऱ्यावर असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांची मुंतजिमा कमिटी कब्रस्तान सावंतवाडीच्या शिष्टमंडळाने आकेरी विश्रामगृहावर भेट घेतली. आपल्या पालकमंत्री फंडातून सावंतवाडी कबरस्तान ईदगाह वर नमाज पठण करण्यासाठी जाणाऱ्या कच्चा रस्त्याचे काम पूर्ण करून त्या रस्त्यास डांबरीकरण करून मिळावे असे निवेदन कबरस्तान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आले. व कब्रस्तान मधील उद्भवणाऱ्या अडचणींबाबत चर्चाही करण्यात आली. पालकमंत्री यांनी आपण याकडे लक्ष घालून रस्त्याचे काम मार्गी लावू असे आश्वासन दिले. याप्रसंगी कब्रस्तान ट्रस्टचे अध्यक्ष तौकिर शेख, उपाध्यक्ष मुजीब शेख, सचिव परवेज बेग, खजिनदार सोहाब बेग, सल्लागार हिदायतुल्ला खान, सदस्य अल्ताफ मुल्ला, इरफान शेख, जावेद शहा, बसित पडवेकर, अरिफ करोल उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा