नीट परीक्षेत राज्यात अव्वल आलेल्या मालवणचा आशिष अविनाश झांटये याचा मनसे सत्कार..

नीट परीक्षेत राज्यात अव्वल आलेल्या मालवणचा आशिष अविनाश झांटये याचा मनसे सत्कार..

मालवण

वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेत निकालात ७१० गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविणाऱ्या मालवणचा सुपुत्र आशिष अविनाश झांट्ये याचा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी निवासस्थानी भेट देवून सत्कार केला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी तालुका अध्यक्ष विनोद सांडव, उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, तालुका सचिव विल्सन गिरकर, उपशहरअध्यक्ष विशाल ओटवणेकर, महिला शहर अध्यक्ष भारती वाघ, उपतालुकाध्यक्षा राधिका गावडे, सायली मांजरेकर, नंदकिशोर गावडे, आई शिल्पा झांट्ये व वडील अविनाश झांट्ये आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा