You are currently viewing गती रोधक अपघात रोखण्यास योग्यच फक्त सूचना फलक लावावा – विलास जाधव

गती रोधक अपघात रोखण्यास योग्यच फक्त सूचना फलक लावावा – विलास जाधव

गती रोधक अपघात रोखण्यास योग्यच,  फक्त सूचना फलक लावावा – विलास जाधव

सावंतवाडी

सार्वजनिक बांधकाम विभागाने मुख्य चौकाच्या दोन्ही बाजूने घातलेले गतिरोधक अपघात घडू नये या दृष्टीने योग्य असून फक्त गतिरोधक आहे वाहने सावकाश हाका अशा प्रकारचे फलक लावणे गरजेचे आहे नाहीतर अपघातास कारण होऊ शकते असे मत माजी नगरसेवक विलास जाधव यांनी व्यक्त करून याबाबतची त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.

सावंतवाडी शहरातील प्रत्येक मुख्य चौकाच्या दोन्ही बाजूने गतिरोधक घालण्यात आले आहेत, अचानक घातलेल्या या गतिरोधकामुळे वाहनधारकांची तारांबळ उडते, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अपघात होऊ नये याची दक्षता म्हणून घातलेले गतिरोधक अपघातास कारणीभूत ठरत असतील तर त्याचा काय उपयोग? म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधकाच्या ठिकाणी या ठिकाणी गतिरोधक आहे वाहने सावकाश हाका अशा प्रकारचे फलक लावल्यास त्याचा फायदा वाहनधारकांना होईल व बांधकाम विभागाचा मूळ हेतू सफल होईल त्या दृष्टीने बांधकाम विभागाने हे गतिरोधक तसेच ठेवून फक्त फलक गतिरोधकाच्या सूचना देणारा फलक लावावा अशी मागणी माजी नगरसेवक विलास जाधव यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + 3 =