You are currently viewing बांदा दाणोली मार्गावरील सळमळे पुल पाण्याखाली..

बांदा दाणोली मार्गावरील सळमळे पुल पाण्याखाली..

बांदा

आज संध्याकाळी पडलेल्या जोरदार पावसामुळे बांदा दाणोली येथील सळमळे पुल सहा तास पाण्याखाली होते. त्यामुळे बांदा दाणोली मार्गावरील वाहतूक काही तास ठप्प होती. त्यामुळे पुणे बेळगाव जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले होते. वारं वारं या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या पुलाच्या उंचीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करू नही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. दाबील नदीला तीन चार् तास पाऊस झाला तरी सळमळे नदीवरील पूल पाण्याखाली जाते.

त्यामुळे हायस्कूल कॉलेज व कामानिमित्त जाणाऱ्या युवकांचे प्रचंड हाल होतात. पर्यायी मार्ग नसल्याने या पुलाला जास्त महत्त्व प्राप्त झाले. हे पूल अतिशय कमजोर झाल्याने भविष्यात दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष वेधावे.हे पूल जिल्हा मार्गावर असल्याने जास्त प्रमाणात वाहतूक होत असल्याने पुलाचा काही भाग कमकुवत झाला आहे. त्यामुळे हे पूल अति पावसात कोसळण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + ten =